आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भिवंडी इमारत दुर्घटना:45 तासांनंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढले; आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू

ठाणेएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोमवारी पहाटे 3.40 च्या सुमारास घडली घटना
 • ही इमारत 1986 मध्ये बांधली होती, त्यात सुमारे 20 कुटुंबे राहत होती

ठाणे स्थित भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 झाली आहे. सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळली होती. ढिगाऱ्याखाली 10 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी 19 लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. मंगळवारी बचाव पथकाने 45 तासांनंतर 42 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले.

खालिद अब्दुल खानला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यानंतर इतरांच्या मदतीसाठी त घटनास्थळी दाखल झाले. खान यांच्यासह आतापर्यंत 25 लोकांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

टीडीआरएफचे सदस्य माझ्यासाठी देवदूतासारखे होते

खान सांगतात की, ढिगाऱ्याखाली अडकलेलो असताना मी टीडीआरएफ टीमच्या सदस्यांचा आवाज ऐकला. ते आतमध्ये अडकलेल्या कोणत्याही लोकांचा शोध घेत होते आणि त्यांना आवाज देत होते. आवाज बचाव दलात असलेल्या अक्षय पाटील यांचा होता. आवाज ऐकल्यानंतर, मी जिवंत वाचू शकेन असा विश्वास वाढला. जणू काय देवाने त्यांना मला वाचवण्यासाठी पाठवले होते असे वाटत होते. टीडीआरएफचे सदस्य माझ्यासाठी देवदूतासारखे होते.

बचावकार्य सुरू आहे

आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

 1. हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
 2. रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
 3. मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
 4. शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
 5. मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
 6. कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
 7. रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
 8. अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
 9. आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
 10. जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
 11. उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे:

 1. झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
 2. फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
 3. आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
 4. बब्बू(पु/२७वर्ष)
 5. फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
 6. फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
 7. उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
 8. असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
 9. अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
 10. सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

सोमवारी पहाटे 3.40 वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये 21 कुटुंबे राहत होती. एनडीआरएफच्या पथकाने सोमवारी सकाळी ढिगाऱ्याखालून एक मुलाला सुखरुप बाहेर काढले. ठाण्याच्या आयुक्तालयाच्या पीआरओने 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. ही इमारत 1984 मध्ये बांधली असल्याचे म्हटले जात आहे. ही इमारत 30 वर्षे जुनी होती, आधीच धोकादायक घोषित केले होते. दोनदा नोटीसही बजावण्यात आली होती.