आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब शहीद म्हणत...:कब्रस्तानच्या कामासाठी अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनची माजी विश्वस्तांना ठार मारण्याची धमकी

विनोद यादव। मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू असतानाच आता या कबरीवरून जुम्मा मस्जिद ऑफ बॉम्बे ट्रस्टच्या माजी विश्वस्तांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या ट्रस्टच्या अंतर्गतच बडा कब्रस्तानचे कामकाज करण्यात येते.

टायगर तुम्हाला ठार मारेल

टायगर मेमनचा चुलत भाऊ मोहम्मद ए.आर. मेमन उर्फ ​​मर्चंट याने ट्रस्टचे माजी विश्वस्त जझील नवरंगे आणि परवेझ इस्माईल यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडाला. याबाबत विश्वस्तांनी जानेवारी, २०२० मध्येच पोलिसांना तक्रारही दिली होती. तक्रारीनुसार, 'याकूब भाई शहीद झाले, पण टायगर भाई अजूनही जिवंत आहे. तुम्ही लोक माझे बडा कब्रस्तानचे काम करा. नाहीतर टायगर भाईशी बोलून मी तुम्हा दोघांना ठार करीन', अशी धमकी मर्चंटने दिली होती.

कबरींच्या मालकीसाठी धमकी

बडा कब्रस्तानमधील काही कबरी कायमस्वरूपी मेमन कुटुंबांच्या मालकीच्या करण्यासाठी विश्वस्तांना टायगर मेमनच्या नावाने धमकावण्यात आले होते. मात्र, तक्रारीनंतरही मुंबई पोलिसांनी मर्चंटवर कोणतीही ठोस आणि समाधानकारक कारवाई केली नाही, असा आरोप विश्वस्तांनी केला आहे.

भाईशी फोनवर बोला

'टायगर भाई काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. जे आजपर्यंत कोणाच्याच हाती आले नाहीत, ते तुम्ही दोघांना कधी गायब करून टाकतील हे तुम्हाला कळणार पण नाही. आताच टायगर भाईशी फोनवर बोला', अशा धमक्या मर्चंट याने दिल्याचे माजी विश्वस्तांनी तक्रारीत म्हटले आहे.

ट्रस्टमधील अनेकांना धमक्या

कुख्यात दहशतवादी टायगर मेमनच्या नावाने दिलेल्या धमकीबाबत माजी विश्वस्त नवरंगे यांनी जानेवारी २०२० मध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त, मुंबई दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख, भारताचे सरन्यायाधीश आणि एल. टी. मार्ग पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. यात कबरीच्या जागेवर मालकी मिळवण्यासाठी टायगर मेमनच्या नावाने त्यांच्यासह ट्रस्टच्या इतर काही लोकांना धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.

कायमस्वरुपी पावती हवी होती

तक्रारीमध्ये माजी विश्वस्त जझील नवरंगे यांनी म्हटले आहे की, टायगर मेमनचा चुलत भाऊ मोहम्मद ए.आर. मेमन उर्फ ​​मर्चंटने जानेवारी 2020 मध्ये मरीन लाइन्स येथील बडा कब्रिस्तानमध्ये आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसाठी कायमस्वरूपी पावती देण्यासाठी दबाव आणला. जेणेकरून बडा कब्रस्तानच्या काही कबरी मेमन कुटुंबीयाच्या नावाच्या आणि मालकीच्या होतील. मात्र, तत्कालीन ट्रस्टच्या लोकांनी मर्चंटचे ऐकले नाही. त्यानंतर त्यांना टायगर मेमनच्या नावाने धमकावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...