आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने:महाराष्ट्रात आठ वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत झाली दुप्पट वाढ, ताडोबात 200 वाघ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील वाघांची संख्या यंदाच्या व्याघ्रगणनेत तिप्पट झाल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यात सध्याच्या घडीला चारशेच्या आसपास वाघ आहेत. आठ वर्षांत दुप्पट, तर गेल्या सतरा वर्षांत राज्यातील वाघांची संख्या तिपटीने वाढली आहे, असा दावा सोमवारी (ता. १०) राज्याच्या वन विभागाने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशातील वाघांची संख्या ३ हजार १६७ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. ती २०२२ मध्ये ३७५ ते ४०० झाली. दर चार वर्षांनी वाघांची गणना होते. २०१८ मध्ये केलेल्या गणनेत वाघांची संख्या ३१२ होती. २०२२ मध्ये वाघांची गणना करण्यात आली आहे. पण त्यात राज्याची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही. वन खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसार आजघडीला राज्यातील वाघांची संख्या ३७५ ते ४०० च्या आसपास आहे.

वर्षागणिक वाढती संख्या
२००६ - १०३

२०१०- १६८

२०१४- १९०

२०१८ - ३१२

२०२२ - ३७५ ते ४००

वाघांमुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने
महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता ही संख्या चारशेच्या पार गेली आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, भोर, उमेर-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे.