आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Tighten The Noose On Arrested Sachin Wajhe: ACB Starts Investigation In The Case Of Accumulating Disproportionate Assets; News And Live Updates

अँटिलिया प्रकरण:सचिन वाझेची अनावश्यक मालमत्ता प्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरु; वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी रुपये

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत अनेक कार आणि एक बाइक जप्त

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेमुदत मालमत्ता प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. एसीबीच्या महासंचालकांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एसीबी सचिन वाझेची जंगम आणि स्थावर मालमत्ता प्रकरणी चौकशी करत असून मालमत्तेच्या स्त्रोतांची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.

सचिन वाझेला एनआयएने गेल्या मार्च महिन्यात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी रुपये
एनआयएच्या तपासानुसार, सचिन वाझेच्या बॅंक खात्यात दीड कोटी रुपये आढळून आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी वाझेने आपल्या मित्राला 76 लाख दिले असल्याचेदेखील तपासातून समोर आले आहे.

सचिन वाझेच्या अटकेनंतर एनआयएने विशेष न्यायालयात म्हटले होते की, सचिन वाझे हे काम स्वत:साठी करतोय की दुसऱ्यासाठी हे आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्यासोबतच त्याच्या मालमत्तेचा स्त्रोत काय आहे? याचादेखील तपास करायचा होता. कारण यापूर्वी अनेकांनी वाझेविरोधात लाचखोरी अनेक अनावश्यक मालमत्ता प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

आतापर्यंत अनेक कार आणि एक बाइक जप्त
NIA ला एक बाइक मिळाली आहे, ती इटालियन बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्ट्स बाइकची किंमत जवळपास 7-8 लाख रुपये आहे. बाइकला सोमवारी एका टेंपोने NIA ऑफिसमध्ये आणण्यात आले. मनसुख प्रकरणात आतापर्यंत आठ लग्जरी कार आणि एक बाइ जप्त करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझेच्या चौकशीच्या आधारावर मुंबईच्या एका फ्लॅटमधून काही दस्तावेजही जब्त केले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण
मुंबई पोलिसांना 25 फेब्रुवारीला संध्याकाळी जवळपास 3 वाजता जिलेटिनने भरलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओचे मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या बाहेर उभी सापडली होती. स्कॉर्पिओमध्ये एक धमकीचे पत्रही होते. CCTV फुटेजच्या तपासात समोर आले की, ही गाडी रात्री एक वाजता पार्क करण्यात आली होती. 5 मार्चला या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह कालवा येथील खाडीमध्ये आढळला होता. पोलिसांनी पहिले ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते आणि नंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास ATS ला सोपवला.

ATS ने यामध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणात माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरेला अटक केली. यानंतर NIA ने न्यायालयाच्या माध्यमातून ही केस ATS कडून आपल्या हातात घेतली आणि आता या प्रकरणाचा तपास NIA करत आहे.

बातम्या आणखी आहेत...