आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर संतप्त पडसाद:राज्यपालांच्या राजीनाम्याची वेळ आलीये- अजित पवार, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मात्र पाठराखण

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्यप्रकरणी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे रविवारी दिवसभर टीकेच्या केंद्रस्थानी होते. कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचित केले.

‘जोडे मारो’आंदोलनातील जोडे राजभवनात नेण्याचा सल्ला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला दिला. कोश्यारी यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. विविध संघटना, राजकीय पक्षांनी राज्यभरात तीव्र निदर्शने करीत कोश्यारींचा धिक्कार केला. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, तर त्यांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्याची पंतप्रधान महोदयांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे’, असे अजित पवार म्हणाले.

राहुल गांधी यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी ते जोडे राजभवनवर घेऊन गेले पाहिजे, असा सल्ला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला. “राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. यापूर्वीह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाजेबची पाच वेळा माफी मागितली, असे विधान त्यांनी केले होते. वादग्रस्त वक्तव्य करणे ही भाजपची भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे सहयोगी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपचा निषेध करणे हे योग्य ठरेल” असे राऊत म्हणाले.

मराठी माणसाला डिवचू नका : राज उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करु नका, तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाहीत. मराठी माणसाला डिवचू नका, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रविवारी दिला. महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यपालांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला : फडणवीस मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हीरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता. सुधांशू त्रिवेदी यांनी कुठेही ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली’ असा उल्लेख केला नसल्याचे फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...