आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांकडून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न:शंभूराज देसाईंची टीका; म्हणाले- सीमाप्रश्नी केंद्राने तोडगा काढावा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न केंद्र सरकारने लक्ष घालून यावर तोडगा काढावा, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, काही जण जाणीवपूर्वक वक्तव्य करून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमाप्रश्नावर दिली आहे.

सहा तारखेला आमचा कर्नाटक दौरा होता. मात्र, काही कारणामुळे तो पुढे ढकलला. तो दौरा पुढे ढकल्यानंतर राज्याचे वातावरण जाणीवपूर्वक खराब करण्याचे काम काही लोकं करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जाणीवपूर्वक विचलीत करण्याचे आणि परिस्थिती बिघडवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे.

राऊतांना आरामाची गरज

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, संजय राऊत तीन-साडेतीन महिने जेलमधून राहून आले आहेत. त्यांना आता आराम करण्याची गरज आहे. पण, ते आता जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहे. मी परत राज्यामध्ये खूप सक्रीय आहे असे दाखवण्याचे प्रयत्न राऊतांचे सुरू आहे.

धाडस का दाखवले नाही

बेळगाव कोर्टाने संजय राऊतांनी समन्स बजावले होते. न्यायव्यवस्थेच्या कक्षेत राहून तुम्ही बेळगावला जाणार होता. एवढे असताना राऊतांनी बेळगावमध्ये जाण्याचे धाडस का दाखवले नाही, आम्हाला षंड म्हटले पण तुम्ही बेळगावात का गेले नाहीत, असा सवाल शंभूराज देसाईंनी केला.

छाती ओढवून बोलू नका

संजय राऊत यांनी लोकांसाठी सामाजिक काम केले नाही. त्यांनी पत्राचाळ घोटाळा केला त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. राऊत सध्या बेलवरती असून तुमची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे छाती ओढवून त्यांनी बोलू नये, अशी खोचक टीकाही देसाई यांनी राऊतांवर केली.

बातम्या आणखी आहेत...