आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • To Bring Corona Under Control, The Whole Country Has To Follow The 'Maharashtra Model', Shivsena Mp Sanjay Raut Maharashtra Cm Uddhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांकडून ठाकरेंच्या नेतृत्त्वाचे कौतुक:कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशाला 'महाराष्ट्र मॉडेल' प्रमाणे चालावे लागेल, मुख्यमंत्र्यांप्रमाणे काम करावे लागेल

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे

देशभरासह राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. असे असतानाच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हातात घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाचे आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी कौतुक केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंप्रमाणेच संपूर्ण देशाने काम करायची गरज असल्याचेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेृत्त्वाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, 'राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल असेही ठाकरे म्हणाले. यासोबतच आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'महाराष्ट्र मॉडेल' प्रमाणेच चालावे लागेल असेही राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री 24 तास काम करत आहेत
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मुंबईत रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 24 तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरू आहे या सर्वांचा आढावा ते घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण यावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे' असेही संजय राऊत म्हणाले.

विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे
संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सूत्रं हातात घेऊन सातत्याने काम करत आहेत. कोणत्याही युद्धामध्ये सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नसतो. ते वॉररुममध्ये बसून यंत्रणा राबवतात आणि विजयाकडे नेतात. महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी होण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे. विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे.' तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मी नुकतेच वाचले आहे. या पत्रामध्ये अनेक सूचना आहेत. त्या सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार या सूचनांचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल.

बातम्या आणखी आहेत...