आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:वैद्यकीय शिक्षण विभागात वर्ग 1 ते 4ची पदे भरणार; 50% भरतीस मंजुरी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

या विभागांतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्ग १ मध्ये प्राध्यापक, वर्ग २ मध्ये सहयोगी प्राध्यापक, आणि वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील रिक्त पदे सध्या ५० टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग ४ मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करून ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-३ संदर्भात मंजूर पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबद्ध वेळेत प्रसिद्ध करून या भरती प्रक्रियेला गती द्यावी, असे देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...