आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्दी प्रकरणी आरोप:वांद्रे प्रकरणामागे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट - अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा, दुबेस कोठडी

वांद्रे रेल्वेस्टेशनबाहेर हजारो परप्रांतीय मजुरांची झालेली गर्दी मोठ्या षड््यंत्राचा भाग होता. यामागे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान असू शकते, असा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी वांद्रे घटना मोठ्या षड््यंत्राचा भाग असून त्यास सिकंदराबाद रेल्वे व्यवस्थापकाचे पत्र कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, वांद्रे स्थानकातून विशेष पॅसेंजर रेल्वे सोडली जाणार आहे, अशी बातमी देणारे एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अटकेतील उत्तर भारतीय महापंचायतीचा नेता विनय दुबेला कोर्टाने २१ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी मशिदीबाहेर मोठा जमाव कसा जमला, असा प्रश्न उपस्थित केला. मिश्रा या घटनेला जातीय रंग देत असून पोलिसांनी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. वांद्रे प्रकरणात ज्या ११ मार्गांनी संदेश पसरवण्यात आले आणि सोशल मीडियाच्या संशयास्पद अकाउंटचा शोध लागला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...