आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई कोरोना:कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी बीएमसीने सुरू केली 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम; हॉस्पिटलला फॉलो करावे लागतील हे प्रोटोकॉल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक बेडसाठी बेडपॅन आवश्यक, प्रत्येक मृत्यूचे विस्तृत ऑडिट होईल

कोरोनामुळे वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम राबवत आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी याची सुरुवात केली. यामध्ये मुंबईत एक खास प्रोटोकॉल लागू करण्यात येत आहे. या प्रोटोकॉलनुसार, मध्यम, कमी गंभीर आणि गंभीर श्रेणीतील कोरोना प्रकरण अशा सर्व केस रुग्णालयांना घ्याव्याच लागतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांच्या दिवसातून दोनदा व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून बैठका होतील. डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी एक टीम म्हणून काम करणार आहेत.

प्रत्येक बेडसाठी बेडपॅन आवश्यक

यासोबतच, संपूर्ण काळजी घेण्यासाठी प्रत्येक दस्ताऐवजवर प्रोटोकॉल आणि चेक बॉक्स तयार होणार आहे, जेणेकरून कुठलीही गय राहणार नाही. रुग्णालयात ऑक्सिजन लावलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन मास्क टॉयलेटला जाताना हटवला जातो. हेच अनेक मृत्यूंचे कारण बनल्याचे सुद्धा सांगितले जाते. प्रामुख्याने रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत हा प्रकार घडतो. त्यामुळे, प्रत्येक बेडवर बेड पॅन आणि 4 बेडसाठी एक कोमोड लावला जाईल. जेणेकरून युरीन आणि टॉयलेटसाठी रुग्णाचा ऑक्सिजन मास्क काढून बाथरुम/टॉयलेटला पाठवण्याची गरज भासणार नाही.

प्रत्येक मृत्यूचे विस्तृत ऑडिट होईल

अँटीव्हायरल्स, स्टेरॉयड आणि प्लाझ्माचा पुरवठा सुरळीत केला जाईल. त्यांचा वापर आवश्यक त्या रुग्णांवर होईल. यूनिटचे हेड आणि इस्टिट्युशनचे हेड यांच्याकडून प्रत्येक प्रकरणाची व्हिडिओवरून पाहणी होत राहील. प्रत्येक मृत्यूचे विस्तृत असे विश्लेषण केले जाईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 76,765 झाली. तर 4463 जणांचा मृत्यू झाला. रुग्णांपैकी 28,749 लोक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 1226 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

0