आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्मिलाचा शिवसेनेत प्रवेश:उर्मिला मातोंडकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश, रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उर्मिलाने मुंबई काँग्रेसमधील हेव्यादाव्यास वैतागून सहा महिन्यांत काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिलाच्या हाती शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती.

शिवसेनेत दाखल होण्यापूर्वी उर्मिलाने सोशल मीडियावर लिहिले. ''ॐ सर्वे भवन्तु सुखिन''

उत्तर मुंबईतून झाला होता पराभव

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 27 मार्च 2019 रोजी उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिने उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कठोर परिश्रम करूनही तिला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सहकार्य न करण्याचा आरोप करत 10 सप्टेंबर 2019 रोजी काँग्रेसचा हात सोडला. एक वर्ष दोन महिन्यांनंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर आपली राजकीय कारकीर्द सुरू करत आहे.

राज्यपाल कोट्यातून 12 सदस्यांची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे

राज्यपालांच्या कोट्यातील नामांकनासाठी 11 इतर लोकांची नावे महाविकास आघाडी सरकारने पाठवली आहेत. राज्यपालांनी या 12 नावांच्या यादीला मंजुरी देणार आहे. उर्मिलाने अलिकडेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना रनोटवर टीका केली होती. ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हाती घेणार अशी चर्चा होती, पण आता याची पुष्टी झाली आहे.

उर्मिलाची चित्रपट कारकीर्द

4 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या उर्मिलाने 1982 सालच्या 'कलयुग' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1991 च्या नरसिम्हा चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. यानंतर 1995 मध्ये रंगीला, 1997 मध्ये जुदाई आणि 1998 मध्ये सत्या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे कौतुक केले. या तिन्ही चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

9 वर्षांनी लहान व्यावसायिकासोबत केले लग्न

उर्मिलाने 2016 मध्ये 9 वर्षांनी लहान काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीरसोबत विवाह केला. मोहसिनने जोया अख्तर दिग्दर्शित 'लक बाय चान्स' चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ते फरहान अख्तरसोबत मॉडेलिंग करताना दिसले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser