आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदा आला रे...:राज्यभरात आज दहीहंडीचा थरार; मुंबई, ठाणे, पुण्यासह संवेदनशील ठिकाणी चोख सुरक्षा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आज तब्बल 3 वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच गुरूवारी रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सकाळपासूनच मुंबई, ठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे.

दहीहंडीमुळे अनेक शहरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेत. मुंबई आणि परिसरात पोलिस स्थानकाच्या हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी पुढच्या आदेशापर्यंत नाकाबंदीचे आयोजन केले जाणार गेले आहे.

जखमी गोविंदांवर मोफत उपचार
आज दहीहंडी कार्यक्रमात कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास त्याच्यावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहे. या संदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सरनाईकांच्या मागणीला यश

आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुटी असावी अशी मागणी गेली अनेक वर्ष लावून धरली होती. यामागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. तर गोविदांचा विम्याचा मुद्दा सुनील प्रभुंनी मांडला यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.​​​​

क्रीडा प्रकारात समावेश

दहीहंडी उत्सवाचा समावेश क्रीडा प्रकारात करावा, यासाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी उत्सव समिती प्रयत्न करत होती. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यासंदर्भात बैठक पार पडली. राज्यात हजारभर गोविंदा पथके असून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच 300 गोविंदा पथके आहेत,’ असे समन्वय समितीचे उपाध्यक्ष समीर पेंढारे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...