आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालिनी ठाकरे यांचा थेट सवाल:आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजही जर बाळासाहेबच सर्व काही करणार असतील, तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच, पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.

पितृपक्ष सुरु होत असून आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली येतील आणि धनुष्य बाण आम्हीच जिंकू असा विश्वास मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. यावरुन शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

शालिनीताई ठाकरे यांचे ट्विट
शालिनीताई ठाकरे यांचे ट्विट

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे.आजही जर कै.बाळासाहेबच सर्व काही करणार असतील,तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच,पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार.

शिवसेना कुणाची?

राज्यातील सत्तासंघर्ष हा गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी झाली. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावीअशी मोठी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. या प्रकरणावर आता 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

चिन्हं स्वतःकडे घ्यायचं किंवा गोठवायचे हा त्यांचा इरादा आहे. पण आमच्याकडे चिन्हावर लढवूनही अनेक जण हरलेत. चिन्हं महत्त्वाचेच आहे, माझा न्यायदेवता आणि संविधानावर विश्वास आहे. तसेच पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, शिवसेना हा खऱ्या अर्थाने पितृपक्ष आहे, पितृपक्षात सगळी पितरं खाली येतात, बाळासाहेबही नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू, असा विश्वास किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...