आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यविक्रीची नवी नियमावली:आता टोकनवर मिळणार दारू: एका तासात ५०, दिवसाला ४०० ग्राहकांची मर्यादा

मुंबई2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • मद्यविक्रीची नवी नियमावली अशी

राज्यात मद्य विक्री दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर मद्य खरेदीसाठी उसळलेली गर्दी व फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा पाहून टोकनद्वारे मद्य विकावे, असा आदेशच राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढला आहे. बँकिंग प्रणालीप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला एक अर्ज देऊन त्यात माहिती भरावी लागेल. एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येणार आहे. दरम्यान, मंगळवारी एका दिवसात सुमारे १७ कोटी रुपयांची ३ ते ४ लाख लिटर मद्य विक्री झाल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. महसूल वाढीस हातभार लावणारी मद्य विक्री दुकाने रेड झोनसह सर्व विभागांमध्ये सुरू करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी काढले. मात्र त्यात स्पष्टता नसल्याने अनेक ठिकाणी दुपारपर्यंत मद्य विक्रीची दुकाने सुरूच झाली नव्हती. दुकानांसमोर प्रचंड रांगा होत्या. पोलिसांना दमदाटीही करावी लागली.

मद्यविक्रीची नवी नियमावली अशी : 

दुकानासमोर मार्किंग करून ग्राहकांना रांगेत उभे करावे लागेल. प्रत्येक ग्राहकाला मद्याची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल. त्यात नाव, मोबाइल नंबर व मद्याच्या मागणीची माहिती (कोणत्या ब्रँडचे मद्य आणि किती नग) भरावी लागणार आहे. हा फॉर्म भरून दिल्यानंतर एक टोकन मद्य विक्रेत्याकडून देण्यात येईल. टोकन उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का व मोबाइल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा लागणार आहे. एका तासात ५० आणि दिवसभरात ४०० ग्राहकांना सेवा देता येईल.

वर्षाला २७ हजार कोटी महसूल

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा तिसऱ्या क्रमांकाचा महसूल निर्मिती विभाग आहे. या विभागाकडून दरवर्षी तब्बल २७ हजार कोटी वार्षिक उत्पन्न मिळते. सर्वाधिक १ लाख ३० हजार कोटी महसूल जीएसटी व व्हॅट विभाग, मुद्रांक शुल्क विभागाकडून २७,५०० कोटींचा महसूल प्राप्त होतो.

बातम्या आणखी आहेत...