आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची मजार:वादानंतर दिवे काढले, मुंबई पोलिस आयुक्तांचे चौकशीचे आदेश; भाजपचा ठाकरे, पवारांवर निशाणा

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कबरीभोवती मार्बल आणि एलईडी दिवे लावण्यात आले होते.

दरम्यान, हा प्रकार समोर येताच मुंबई पोलिसांनी कबरीभोवतीचे एलईडी दिवे काढले आहेत. तसेच, मुंबई महापालिकेचे पथकही लवकरच कबरीची पाहणी करणार आहे.

सजावटीपूर्वीची याकूब मेमनची कबर.
सजावटीपूर्वीची याकूब मेमनची कबर.

बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या मृतदेहाला मुंबईतील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते. दरम्यान, एका दहशतवाद्याच्या कबरीची अशा पद्धतीने सजावट केल्याचे समोर आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

पोलिस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी याकुब मेमन कबर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एलईटी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करणार आहेत. पोलिस वक्फ बोर्ड, महापालिका, धर्मादाय आयुक्त यांच्याकडून अधिक माहिती घेत आहेत.

वाद निरर्थक

बडा कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांनी सांगितले की, याकूब मेमनच्या कबरीबाबत जो वाद सुरू आहे, तो निरर्थक आहे. ज्या जागेवरून वाद सुरू आहे, तेथे याकूबसह 16 ते 17 कबरी आहे. या कबरीजवळील माती सरकू लागल्याने सुमारे पाच वर्षांपूर्वी परवानगी घेऊन कबरीजवळ संगमरवरी दगड बसवले होते. तसेच, दिवे लावले तिथे गुसलखाना आहे. रात्री मृतांच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून तिथे दिवे लावले होते. वाचा सविस्तर

मजारमध्ये रूपांतर

कबरीच्या सजावटीवरून भाजप नेत्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारच्या काळातच या कबरीचे मजारमध्ये रुपांतर झाल्याचा आरोप करत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधींनी याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरेंवर आरोप

भाजप नेते राम कदम यांनी सांगितले, अतिशय क्रूर दहशतवादी असलेल्या याकूब मेमने पाकच्या सांगण्यावरून मुंबईत बॉम्बस्फोट केले होते. हजारो निष्पाप लोकांचा या बॉम्बस्फोटात जीव गेला. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या डोळ्यादेखत या कबरीचे मजारमध्ये रुपांतर होते. कबरीला मार्बल लावले जाते, एलईडी दिवे बसवले जाते, तिथे पहारा ठेवला जातो, हे अतिशय लज्जास्पद आहे.

याकूब मेमनच्या कबरीला लावण्यात आलेले संगमरवरी दगड व एलईडी दिवे.
याकूब मेमनच्या कबरीला लावण्यात आलेले संगमरवरी दगड व एलईडी दिवे.

मविआ नेते गप्प का?

राम कदम म्हणाले, ज्या दहशतवाद्याने हजारो मुंबईकरांचे जीव घेतले, अशा दहशतवाद्याच्या कबरीची मविआ सरकारच्या काळात मजार होत होती. हे सर्व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राहुल गांधी यांच्या डोळ्यासमोर झाले. तरीदेखील हे नेते गप्प आहेत, याचे कारण काय? याप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांना उत्तर द्यावेच लागेल.

बडा कब्रस्तानमधील याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिवे काढताना याकूब मेमन.
बडा कब्रस्तानमधील याकूब मेमनच्या कबरीवरील एलईडी दिवे काढताना याकूब मेमन.

कबरीवरून पूर्वीही वाद

साधारणत: 18 महिन्यांनंतर कब्रस्तानमधील एखाद्या कबरीच्या जागेवर पुन्हा खोदकाम करता येऊ शकते. परंतु याकूबची कबर 5 वर्षांपासून जैसे थे स्थितीत आहे. दरम्यान, या कबरीवरून पूर्वीही वाद झाले आहेत. याकुबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने एलईटी मार्ग पोलिसांत कब्रस्तान ट्रस्टविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ट्रस्टींनी याकूब मेमनच्या कबरीची जागा 5 लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

भाजप नेते राम कदम यांनी कबरीचे फोटो शेअर केले आहेत. त्यात कबरीवर फुले वाहिलेली दिसत आहेत.
भाजप नेते राम कदम यांनी कबरीचे फोटो शेअर केले आहेत. त्यात कबरीवर फुले वाहिलेली दिसत आहेत.

संबंधित बातम्या

ठाकरेंनी माफी मागावी:याकूब मेमन कबर सुशोभीकरणास बावनकुळेंनी 'मविआ'ला धरले जबाबदार; काँग्रेस म्हणते भाजपच कारणीभूत

चार्टर्ड अकाउंटंट होता याकूब, भाऊ टायगरमुळे गुन्हेगारी विश्वात एंट्री

अंबादास दानवेंचा विरोधकांवर पलटवार:मेमनचे उदात्तीकरण नको, मात्र माफी मागा म्हणणे हा नादानपणा

याकूब मेमनबद्दल सहानुभूती नाही!:बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींची स्पष्टोक्ती, म्हणाले - कबरींची पडझड रोखण्यासाठी संगमरवरी दगड लावले

ठाकरे आणि मेमन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, भाजपच्या टीकेला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर

बातम्या आणखी आहेत...