आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेली निवडणूक हा महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण एकदिवसीय सामना होता. यात शेवटच्या अवरमध्ये फडणवीस यांनी अपक्षांची सहा मते पळवत षटकार लगावला तो असा...
1. मुख्यमंत्री ज्यांना भेटतही नव्हते, त्यांना केले आपलेसे
विधानसभेत १३ अपक्ष आणि छोट्या पक्षांचे १६ असे २९ आमदार आहेत. तिघांना सेनेने मंत्रिपदे दिलीत. इतरांना मुख्यमंत्री कधी भेटले नव्हते. देवेंद्रांनी त्यांना आपलेसे केले.
2. ज्यांचे गैरव्यवहार; त्यांना दाखवली ईडी
बविआ, रासप उमेदवारांवर ईडी कारवाया सुरू आहेत. संजय मामा शिंदे व शेकापचे श्यामसुंदर शिंदे ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना आपल्याकडे वळवले.
3. महाविकास आघाडीतल्या मतभेदांचा घेतला फायदा
सेनेने संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देण्याचा शरद पवार यांचा सल्ला ऐकला नाही. काँग्रेसने आपल्या ४४ मतांचा कोटा वापरला. या मतभेदांचा देवेंद्र यांंनी फायदा उचलला.
4. काँग्रेसविरोधी पक्षांना सहकार्याचे दिले आश्वासन
समाजवादी, एमआयएम या काँग्रेसविरोधी पक्षांना सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मतदारसंघात भाजपचा ‘अनुकूल’ उमेदवार देण्याचा शब्द दिला.
5. ‘सरकार रिटर्न’चे स्वप्न दाखवत केली जवळीक
आगामी सरकार भाजपचे येणार, पुन्हा मीच मुख्यमंत्री हे आश्वासन देत मविआचे काही खरे नाही, असा संदेश अपक्ष व छोट्या पक्षांपर्यंत फडणवीस यांनी पोहोचवला.
6. धनंजय ‘सांभाळून’ घेईल याची दिली खात्री
आगामी विधानसभा निवडणुकीत उद्योगपती धनंजय महाडिक मदत करतील असे वचन दिले गेले. यामुळे अनेकांची मते वळल्याचेे विरोधक सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.