आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज मुंबईतील बीकेसी मैदानावर अभुतपुर्व सभा झाली. या सभेत यापुर्वी कधीही पाहिले नव्हते असे उद्धव ठाकरे दिसले. त्यांनी आपल्या भाषणाने सर्वकष मुद्यांवर घणाघात केला. चौफेर फटकेबाजी करताना आपले बंधु आणि मनसे नेते राज ठाकरेंनाही सोडले नाही विरोधकांवरही हल्ल्यावर हल्ले चढविले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे प्रमुख पाच मुद्दे महत्वाचे ठरले आहेत ते खालीलप्रमाणे
1) मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव
मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आमच्या 106 हुतात्मांनी बलिदान देऊन मुंबई एकसंघ ठेवली आहे. यासाठी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांनी काम केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून हा प्रयत्न सुरू आहे. असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. बीकेसीतून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होत आहे. आपण बुलेट ट्रेन मागितली होती का? हा सर्व मुंबई तोडण्याचा प्रयत्न आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
2) जनसंघावर बरसले ठाकरे, हिंदुत्वावरुनही भाजपला सुनावले
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जनसंघ अस्तित्वात होता. पण, एकदाही तो रणांगणात उतरला नाही. महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. पण, जनसंघच जागावाटपावरून या समितीतून बाहेर पडला. आता हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. टोपीत हिंदुत्व नसते तर टोपीखालच्या डोक्यात हिंदुत्व असते, भगवी टोपी घालून हिंदुत्व दिसत नसते. भाजपचे लोक मनोरुग्ण आहेत असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जांच्यांवर विश्वास ठेवला त्यांनी केसाने गळा कापला असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हिंदुत्व सोडायला ते धोतर नाही
सत्ता असो वा नसो मला पर्वा नाही. माझे हिंदुत्व तकलादू नाही हे मी अनेकदा सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. मात्र हिंदुत्व सोडायला ते धोतर आहे का? आम्ही दोन्ही काँग्रेससोबत खूलेआमपणे गेलो. तुम्हीही राष्ट्रवादीसोबत सकाळच्यावेळी गेले नव्हता काय?, असेही ते यावेळी आपला हल्ला आणखी धारदार करताना म्हणाले.
3) दाऊद प्रकरणावरुनही केली भाजपवर टीका
भाजपचे लोक आज दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद भाजपमध्ये आला तर हे लोक त्यालाही मंत्री करतील. मी मध्येच म्हणालो की आमचे हिंदुत्व हे गदा वाहणारे आहे, तुमच्यासारखे घंटा वाजवणारे नाही. आमचे हिंदुत्व गाढव आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. होय, आम्ही 3 वर्षांपूर्वी गाढव आमच्यापासून दूर केले. गदा उचलण्यासाठी ताकद लागते, जी फक्त शिवसेनेकडे आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे.
4) पंतप्रधानांवरही खरमरीत टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींनी कोविडच्या मुद्यावर बैठक बोलावली व पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा म्हणाले. आहेत तर ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल, तर तुमचा भाजप तरी वाजपेयींचा राहिला आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोनाच्या काळात तुम्ही थाळ्या वाजवायला लावल्या, मात्र त्या थाळ्या अजूनही रिकाम्या आहेत. तर शिवसेनेने 10 कोटी शिवभोजन थाळ्या या काळात दिल्या आहेत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे . ज्यांना इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून तो समजला नाही, तो खोटा हिंदुत्वाचा मुखवटा घालणारा पक्ष देशाची दिशा भरटकवतोय असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे
5) भोंगावाद, हनुमान चालिसावरुन फटकारले
हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरून आणि मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. तिकडे काश्मीरी पंडितांना संरक्षण देण्यात येत नाही. टिनपाटांना झेड सिक्यॉरिटी देण्यात येत आहे. असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.