आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1575 वर पोहोचला: 9 दिवसांत 80% प्रकरणे वाढली, मुंबईत 132 नवीन रुग्णांची वाढ

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संक्रमित आणि मृतांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर

कोरोना व्हायरसमुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात 27 दिवसात रुग्णांच्या संख्येत 100 टक्के वाढ झाली आहे. राज्यात 14 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 होती, जी 10 एप्रिलपर्यंत वाढून 1575 झाली आहे. यापैकी फक्त मुंबईमध्येच 993 कोरोनाग्रस्त आहेत. शुक्रवारी 218 नवीन रुग्ण सापडले तर 10 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण मृतांचा आकडा 108 झाला आहे.

याआधी गुरुवारी सर्वाधिक 229 प्रकरणे समोर आली होती. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 97 लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमित आणि मृतांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आहे. गुरुवारी एकाच दिवसात 25 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

आज अकोल्यात कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील चौघेजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तीन वर्षांची चिमुलीसह पाच वर्षांचा मुलगा आणि 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. आता अकोल्यातील रुग्णाची संख्या 13 वर पोहचली आहे. दुसरीकडे पुण्यात आज आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यासोबतच पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 190 आणि जिल्हाभरात 225 झाली आहे. धुळ्यातही आज कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, मालेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेला धुळ्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील 22 कोरोनाग्रस्त उपचारानंतर झाले बरे, पालकमंत्र्यांची माहिती

सांगली जिल्ह्यातील 26 कोरोनाग्रस्तांपैकी 22 जण पूर्णपणे बरे झाल्याचा दावा सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. तसेच त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचे कौतुक केले.

तत्पूर्वी गुरुवारी राज्यात एकूण 25 कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद झाली. यापैकी 14 मृत्यू पुण्यातील आहेत, 9 मुंबई, मालेगाव, रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एका 101 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा 97 वर गेला आहे. सध्या 1,142 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आराेग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.

कोरोना ट्रेंड: राज्यात 8 दिवसात 80% नवीन प्रकरणे

महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. एका महिन्यात सर्वाधिक 1,297 प्रकरणे वाढली आहेत. कोरोनाचा कल पाहता हे दिसून येते की यापैकी 80 टक्के पेक्षा जास्त प्रकरणे एप्रिलच्या फक्त आठ दिवसांत आली आहेत. 31 मार्चपर्यंत राज्यात 220 पॉझिटिव्ह रुग्ण होते. 1 ते 8 एप्रिल दरम्यान 915 प्रकरणे नोंदली गेली. 9 मार्च रोजी राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या तीन प्रकरणांची पुष्टी झाली होती. 

12 मृतांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त, 84% रुग्णांना अनेक आजार

गुरुवारी झालेल्या मृत्यूंत १५ पुरुष, तर १० महिलांचा समावेश आहे. २५ मृत्यूंपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत. मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. दोघे ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...