आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना नियम:व्यापाऱ्यांनी कोरोना नियम मोडू नये - उद्धव ठाकरे यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना रुग्णवाढ अधिक असलेल्या पुणे शहरासह राज्यातील ११ जिल्ह्यात निर्बंध शिथिल केलेले नाहीत, मात्र तेथील व्यापारी व नागरिक यांनी संयम ठेवावा, कोरोना निर्बंध मोडू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. पुणे,सोलापूर शहरात निर्बंध लागू असल्याने व्यापारी संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले.

बृहन्मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम वॉर्डच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळे ते बोलत होते. यावेळी उद्धव म्हणाले, जेथे शक्य आहे, तेथे कोरोना निर्बंधात सवलत दिली आहे. आता काही ठिकाणी प्रशासनाचा नाईलाज आहे. मात्र नागरिकांनी संयम ठेवावा, व्यापाऱ्यांनी नियम तोडू नयेत. हे सर्व तुमच्या हिताचे आहे. २५ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ घटत आहे. मात्र ११ जिल्ह्यात कोरोनाची चिंता करण्यासारखी स्थिती नसली तरी काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...