आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आयएएस ट्रान्सफर:महाराष्ट्रातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचे आदेश 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाद्वारे 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाद्वारे बदल्या केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे ज्या 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सौरभ कटियार सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू पालकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

कुमार आशीर्वाद जे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक येथे कार्यरत आहेत यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर करण्यात आली. श्रीकृष्णनाथ पांचाळ जे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा येथे आहेत. यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर करण्यात आली. इंदू राणी जाकर ज्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर करण्यात आली आहे. तर अभिनव गोयल जे प्रकल्प अधिकारी, किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी नांदेड़ येथे आहेत. त्यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.