आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या:संजय दैने मालेगाव पालिका आयुक्त, नीलेश गटणेंची नांदेड पालिका आयुक्तपदी बदली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात अलीकडेच आयएएस म्हणून बढती मिळालेल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने यांची बदली मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी तर पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष नीलेश गटणे यांची बदली नांदेड महापालिका आयुक्तपदी करण्यात आली आहे.

जी. एस. पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर करण्यात आली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.

कौशल्य विकास विभाग, नवी मुंबई येथील आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली मंत्रालयात उद्योग विभागाच्या सहसचिवपदी झाली आहे. तर अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांची बदली सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण मुंबई या पदावर तर पी. डी. मलिकनेर यांची सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी झाली आहे. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे येथे झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांची नियुक्ती अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...