आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पोलिसांच्या बदल्या:​​​​​​​सुनील लांजेवारांची अपर पोलिस अधीेक्षकपदी औरंगाबादेत बदली; 7 आयुक्तांसह 109 जणांच्या बदल्या

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृह विभागाने सोमवारी राज्यातील तब्बल १०९ पोलिस उपायुक्त / अप्पर अधीक्षक / पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुण्यातील ७ पोलिस उपायुक्तांचा समावेश आहे. परभणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अबिनाशकुमार यांची बदली नांदेडच्या अपर पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे यांची बदली मालेगावच्या अपर पाेलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जळगाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिता यांची बदली अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली येथे करण्यात आली आहे. हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यतीश देशमुख यांची बदली गडचिरोली येथे करण्यात आली आहे. सुनील लांजेवार अपर पोलिस अधीक्षक बीड यांची बदली अपर पोलिस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद येथे करण्यात आली आहे. याशिवाय १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या निवडक अधिकाऱ्यांची विद्यमान पदस्थापना व बदलीचे ठिकाण खालीलप्रमाणे नाव सध्याची नियुक्ती बदलीचे ठिकाण अमोघ गावकर अधीक्षक, अमरावती पोलिस उपायुक्त, मुंबई शहर प्रियंका नारनवरे उपायुक्त, पुणे समादेशक, नागपूर गौरव सिंग अधीक्षक, नाशिक उपायुक्त, मुंबई शहर भाग्यश्री नवटके उपायुक्त, पुणे समादेशक, चंद्रपूर नाव सध्याची नियुक्ती बदलीचे ठिकाण संदीपसिंह गिल समादेशक, हिंगोली उपायुक्त, पुणे शहर विश्वास पांढरे उपायुक्त, मुंबई अधीक्षक, नागपूर सुनील कडासने अधीक्षक, नाशिक अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर अमोल तांबे उपायुक्त, नाशिक शहर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे अनुराग जैन अ. पोलिस अधीक्षक, लातूर उपायुक्त, नागपूर शहर गोरख भामरे अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव उपायुक्त, नागपूर शहर पौर्णिमा गायकवाड उपायुक्त, पुणे शहर समादेशक, हिंगोली यशवंत सोळंके अप्पर पोलिस अधीक्षक, वर्धा अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, नागपूर प्रशांत खैरे अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर अप्पर पोलिस अधीक्षक, नगर गीता चव्हाण उपायुक्त, मुंबई शहर उपायुक्त, गुप्तवार्ता विभाग, नाशिक संभाजी कदम अधीक्षक, तांत्रिक सेवा, पुणे उपायुक्त, अमरावती शहर प्रशांत बच्छाव अप्पर पोलिस अधीक्षक, धुळे उपायुक्त, नाशिक शहर दीपाली घाटे उपायुक्त, सोलापूर शहर अप्पर पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण मिलिंद मोहिते अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती अप्पर पोलिस अधीक्षक, हिंगोली विजय खरात पोलिस उपायुक्त, नाशिक सहायक पोलिस महानिरीक्षक, दक्षता, मुंबई बापू बांगर उपायुक्त, सोलापूर पोलिस अधीक्षक, मुंबई अजय देवरे अधीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक अप्पर पोलिस अधीक्षक, परभणी राहुल खाडे पोलिस अधीक्षक, लाचलुचपत पोलिस अधीक्षक, अमरावती प्रतिबंधक, औरंगाबाद खंडेराव धरणे अप्पर पोलिस अधीक्षक, यवतमाळ अप्पर पोलिस अधीक्षक, भोकर विजय कबाडे अप्पर पोलिस अधीक्षक, भोकर अप्पर पोलिस अधीक्षक, वर्धा विक्रांत देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक, जालना उपायुक्त, पुणे शहर चंद्रकांत खांडवी अप्पर पोलिस अधीक्षक, मालेगाव पोलिस उपायुक्त, नाशिक अकबर पठाण पोलिस अधीक्षक, नागरी हक्क, नाशिक उपायुक्त, मुंबई शहर संदीप आटोळे उपायुक्त, मुंबई शहर पो.अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, औरंगाबाद शर्मिला घारगे उपायुक्त, गुप्तवार्ता विभाग, नाशिक अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव अशोक थोरात प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला अप्पर पोलिस अधीक्षक खामगाव दीपाली काळे पोलिस अकादमी, नाशिक उपायुक्त, सोलापूर शहर

बातम्या आणखी आहेत...