आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बदल्यांचे सत्र सुरूच:राज्यातील 50 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमिताभ गुप्ता पुणे पोलिस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • औरंगाबादचे एसीबी अधीक्षक चावरिया यांची बुलडाण्याला बदली

राज्य शासनाने गुरुवारी 50 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात 22 जिल्हा व ग्रामीण पोलिस अधीक्षक नेमण्यात आले आहेत. गृह विभागाचे (विशेष) प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सुरक्षा मंडळाचे अपर पोलिस महासंचालक विनीत अग्रवाल यांची गृह विभागाच्या (विशेष) प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांची अपर पोलिस महासंचालक (विशेष अभियान) पदी बदली करण्यात आली. औरंगाबादचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बुलडाणा येथे पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक नियुक्त्या :

 • विनायक देशमुख (जालना)
 • राजा रामास्वामी (बीड)
 • प्रमोद शेवाळे (नांदेड)
 • निखिल पिंगळे (लातूर)
 • जयंत मीना (परभणी)
 • राकेश कलासागर (हिंगोली)
 • प्रवीण मुंढे (जळगाव)
 • सचिन पाटील (नाशिक ग्रामीण)
 • वसंत जाधव (भंडारा)
 • प्रशांत होळकर (वर्धा)
 • अरविंद साळवे (चंद्रपूर)
 • अंकित गोयल (गडचिरोली)