आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीकडून चौकशी:परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर चौकशीसाठी हजर, म्हणाले - 'चौकशी का केली जातेय याची कल्पना नाही, पण पूर्ण सहकार्य करेल'

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीने पुन्हा एक समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परबांना आलेले हे दुसरे समन्स याहे. यानंतर आज अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी अनिल परब यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. चौकशी का केली जात आहे याची कल्पना नाही, मात्र पूर्ण सहकार्य करेल असे ते म्हणाले आहेत.

याविषयी माध्यमांसोबत संवाद साधताना अनिल परब म्हणाले की, 'मला आज ईडीकडून दुसरे समन्स बजावण्यात आले आहे. मी चौकशीसाठी आज जात आहे. मी शिवसेनाप्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन यापूर्वीच सांगितले आहे की, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे आज मी चौकशीसाठी सामोरे जात आहे. चौकशीत जे प्रश्न मला विचारले जातील त्याची उत्तरे दिली जातील आणि चौकशीत पूर्णपणे सहकार्य मी करेल. चौकशीला नेमके का बोलवले आहे याचे कारण अद्याप मला माहिती नाही. चौकशी झाल्यानंतर याविषयी अधिकृतरित्या कळेल. पण माझ्याकडून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही.

यापूर्वी देखील ईडीने अनिल परबांना समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यावेळी 31 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी परब हे चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...