आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:ईडीच्या नोटीसनंतर परिवहनमंत्री अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नसल्याने नोटीस कशासंदर्भात याचे उत्तर देणे कठीण'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असे काहीतरी होईल.

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या मंगळवारी 31 ऑगस्टला परब यांनी ईडी कार्यालयात हजर रहावे असे समन्स बजावण्यात आले आहे. राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले होते. यानंतर राणे यांना अटकही झाली होती, जामिनावर त्यांची सुटका झाली असली तरीही हे प्रकरण अद्याप पूर्णपणे शांत झालेले नाही. दरम्यान आता परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीशीवर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले की, 'आज संध्याकाळी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र या नोटीशीमध्ये कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. फक्त 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, आमच्या कार्यलायात आपण व्हावे असे त्यात म्हटलेले आहे. या शिवाय दुसरा कुठलाही विशेष उल्लेख केलेला नाही. ज्यामध्ये नोटीस कशाच्या संदर्भात आहे हे कळू शकेल. यामुळे मला आता नोटीस कशासंदर्भात आहे त्याचे उत्तर देणे कठीण आहे.'

पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, 'आम्हाला अशी अपेक्षा होतीच, की असे काहीतरी होईल. त्याप्रमाणे आता कायदेशीर सल्ला घेऊन, आम्ही त्याचे उत्तर देणार आहोत. मी आता यावर कुठलाही उल्लेख करणार नाही. मला ते सगळे कारण कळले पाहिजे. जी कारणे कळतील, त्यावेळी त्याचे कायदेशीर उत्तर काय असेल ते मी देईन. या सर्व घडामोडींवर मी कायदेशीर अभ्यास करून त्याविषयीचा निर्णय घेणार आहे. कायदेशीर नोटीस आली आहे, त्याला कायदेशीररित्या उत्तर देण्यात येईल' असे परब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...