आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:परिवहनमंत्री अनिल परब यांची तिसऱ्या दिवशी चौकशी

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांची गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. मनी लाँड्रिंगप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. परब दुपारी पावणेतीन वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

दापोली बीच परिसरात उभारण्यात आलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी ही चौकशी सुरू असून या बांधकामात किनारपट्टी भागातील बांधकामासंबंधी असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा परब यांच्यावर आरोप आहे. बुधवारी परब यांची ईडीने सुमारे १० तास चौकशी केली होती. मे महिन्यात ईडीने परब यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर छापेही टाकले होते.

बातम्या आणखी आहेत...