आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसे-फडणवीस वाद:क्लिप्स, फोटो उघड केल्यास हादरा बसेल, खडसेंचा इशारा; देशहितासाठी हा प्रकार समोर आला पाहिजे : काँग्रेस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांनी कन्येची शपथ घेऊन राज्यपालपदाची ऑफर दिली, पण नंतर दुसरीच नावे आली समोर - खडसे

माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि कागदपत्रे आहेत. ती समोर आली की हादरा बसेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. देशहितासाठी या व्हिडिओ फ्लिप्स आणि फोटो बाहेर आलेच पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

एका मुलाखतीत खडसे म्हणाले, मागे मी एक विधान केले होते. त्यात मी काही गोष्टी उघड केल्या तर हादरा बसेल असे सांगितले होते. देशाला हादरा बसेल असे म्हटले नव्हते. माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि कागदपत्रे आहेत. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत हे मी वरिष्ठांना दाखवून दिले आहे. पण मी इतक्या पातळीवर जाऊन राजकारण करणार नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देशहितासाठी या व्हिडिओ क्लिप्स बाहेर आणण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देऊन सर्व ड्रायक्लीन करून टाकतात. देशहितासाठी आपल्याकडील सर्व व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत.’

कन्येची शपथ घेऊन राज्यपालपदाची ऑफर

एकनाथ खडसे म्हणाले, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मला राज्यसभेत पाठवणार असल्याचे सांगितले. पण नंतर दुसरीच चार नावे आली.