आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाणे:पतीने फोनवरुन दिला तलाक, पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पती फरार

ठाणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो
  • पतीने फोन केला आणि भांडण केले, मग तलाक दिला - महिलेचा आरोप

ठाण्यामध्ये पतीने तीनवेळेस तलाक म्हणत तीन वर्षांचे नाते संपवले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. शांतीनगर पोलिसांनुसार, 27 वर्षीय खालिद हुसैन शेखने पत्नीला फोनवर तलाक दिला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.

3 वर्षांपूर्वी झाला होता विवाह

ठाणे शहरातील गबीर नगर परिसरात हे कुटुंब राहते. 24 वर्षीय महिलेचा तीन वर्षांपूर्वी हुसैन शेखसोबत विवाह झाला होता. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, हुंड्यासाठी तिला आणि तिच्या माहेरच्यांना त्रास दिला जात होता. रोजच्या भांडणाला कंटाळून ती एक महिन्यापूर्वी तिच्या माहेरी गेली होती. पतीने तिला फोन केला आणि संभाषणाचे भांडणात रुपांतर झाले. यामुळे पतीने रागाच्या भरात तिला फोनवरच तलाक दिला.

तिहेरी तलाकसंदर्भात ही आहे नवीन तरतूद

2019 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात तिहेरी तलाक संदर्भात सुधारित विधेयक मंजूर झाले. त्याअंतर्गत आरोपींना पोलिसांकडून जामीन मिळणार नाही. पत्नीची बाजू ऐकून घेतल्यानंतर वाजवी कारणांनुसार दंडाधिकारी जामीन मंजूर करू शकतात. पती-पत्नीमधील सामंजस्य करून लग्न टिकवून ठेवण्याचा देखील त्यांना अधिकार असेल.

विधेयकानुसार, खटल्याचा निर्णय होईपर्यंत मूल आईच्या ताब्यात राहील. आरोपीला त्याचा खर्च देखील द्यावा लागेल. जेव्हा त्रस्त पत्नी किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी (माहेरचे किंवा सासरचे) एफआयआर दाखल केला तेव्हाच तिहेरी तलाकचा गुन्हा लक्षात घेता येईल.