आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीआरपी घोटाळा:एका आरोपीच्या खात्यात अकरा महिन्यांमध्ये आले एक कोटी रुपये, अनेकदा 20-25 लाखांच्या हप्त्यात खात्यात रक्कम जमा झाल्याचा पोलिसांचा दावा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई क्राइम इंटेलिजन्स युनिटकडून टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत चौघांना अटक, हंसा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश

टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आणखी एक गाैप्यस्फोट केला आहे. पोलिसांनुसार चार आरोपींपैकी एक बोमपेली राव मिस्त्री याच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०१९ पासून आतापर्यंत २०-२५ लाखांच्या हप्त्याद्वारे एकूण एक कोटी रुपये पाठवण्यात आले. हे पैसे कोठून आले याची माहिती अद्याप मिळाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. रविवारी रिपब्लिकन टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानीचीही मुंबई पोलिसांनी चौकशी केली. मुंबई क्राइम इंटेलिजन्स युनिटने टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. यात हंसा कंपनीचे दोन कर्मचारी विशाल भंडारी आणि बोमपेली राव मिस्त्री यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, बोमपेली राव मिस्त्रीच्या उत्पन्नाचे मार्ग बघता तो एक कोटी रुपये आपल्या उत्पन्नातून कमावू शकत नाही. पोलिसांनी मिस्त्रीच्या बँक लॉकरमध्ये आढळलेले ८.५ लाख रुपये जप्त केले असून त्यांची बँक खातीही गोठवली आहेत. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तीन चॅनेल रिपब्लिकन टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाविरोधात टीआरपी घोटाळ्याची चौकशी करत आहे. या चॅनेल्सनी ज्या लोकांच्या घरी टीआरपी मीटर लावले होते त्यांना पैसे देऊन आपले चॅनेल चालवल्याचा आरोप आहे. भंडारी गुगल पेद्वारे पैसे पाठवायचा. मिस्त्रीवर आरोप आहे की, त्याने एक दुसरा आरोपी विशाल भंडारीला पैसे दिले. पोलिसांनी सांगितले की, भंडारी मीटर असणाऱ्या ८३ घरांसाठीही जबाबदार होता. पोलिसांनी सांगितले की, या ८३ पैकी ३८ घरातील लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत

बातम्या आणखी आहेत...