आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णब तुरुंगातच:फेक टीआरपी प्रकरणात रिपब्लिक ग्रुपचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पोलिसांच्या तावडीत, अर्णब गोस्वामीच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या AVP (असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट) घनश्याम ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. फेक टीआरपी प्रकरणात पोलिसांनी रिपब्लिकच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्याची ही पहिली वेळ आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी घनश्याम यांची 30 तास चौकशी केली होती.

अर्णब प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दखल घ्यावी, अँकरचे पत्र

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतर तेथील एका सूत्रसंचालकाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एसए बोबडे यांना पत्र लिहिले आहे. अर्णबला तालोजा जेलमध्ये कुख्यात गुन्हेगारांसोबत ठेवण्यात आले आहे असा दावा त्यांनी केला. सोबतच, सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीची दखल घ्यावी अशी विनंती त्यामध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अर्णब गोस्वामीला मुंबई हायकोर्टाने सोमवारी पुन्हा जामीन नकारला. अर्णबला 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

कंगणाचे ट्विट -

2018 मध्ये इंटीरिअर डिझायनर अन्वय नाइक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणी अर्णबला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कोर्टाने अर्णबला कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर अर्णबच्या वकिलांकडून पुन्हा एक जामीन अर्ज दाखल करण्यात आला. आज त्यावर सुनावणी शक्य आहे. हायकोर्टाने जिल्हा व सत्र न्यायालयाला 4 दिवसांच्या आत जामीनावर निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.