आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात वाळू वाहतूक करणारा डंपर रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात रिक्षातील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
5 लाखांची मदत
मृतांमध्ये रिक्षाचालक व 3 प्रवाशी तरुणींचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
रिक्षातील प्रवासी वाळुखाली दबले
या अपघातात वाळूखाली गाडले गेल्याने रिक्षातील प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा गोरेगावच्या दिशेने जात होती. यावेळी डंपरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलिस यंत्रणा, रेस्क्यू टीमने तातडीने धाव घेतली. अवजड असलेला डंपर रिक्षावरून काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनची मदत घेण्यात आली. पण वाळूखाली गाडले गेल्याने यात चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांची नावे
1. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे (वय 23), 2. अमन उमर बहुर (वय 46), 3. आसिया सिद्दीक (वय 20) आणि नाजमीन मुफीद करबेलकर (वय २२) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
दोन एसटी बसची धडक
दुसऱ्या एका घटनेत पालघर जिल्ह्यातील जव्हार सिल्वासा रोडवर दोन एसटी बसमध्ये भीषण धडक झाली आहे. या अपघातात सुमारे 20 ते 22 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.