आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून बदली करण्यात आली. या बदलीमध्ये कोणताही सहभाग नाही असे स्पष्ट करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा विषय त्यांचया बाजूने संपवला आहे. मात्र, गेले काही दिवस त्यांच्यात उडणारे खटके यामुळे मुंढेंच्या बदलीमागे सावंत हे प्रमुख कारण आहे, अशी चर्चा रंगली आहे.
तुकाराम मुंढे कोणत्या खात्यात जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, अवघ्या 59 दिवसांत तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागातून बदली झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने नवी नियुक्ती दिल्यानंतर दोनच महिन्यात तुकाराम मुंढेंना पुन्हा हटवण्यात आले असून त्यांच्याविरोधात लॉबी सक्रिय झाल्यामुळे सरकारने दबावातून ही बदली केल्याचे बोलले जात आहे.
सावंतासोबत उडाले खटके
तुकाराम मुंढेंना आरोग्य सेवा आयुक्त म्हणून पोस्टिंग मिळाली आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे खटके उडायला लागल्याच्या बातम्या समोर आल्या. मुंढे यांना आरोग्य खात्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणले होते, मात्र मागील दोन महिन्यांत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंढे यांच्या विस्तव जात नव्हता.
वरिष्ठ डॉक्टरांची नाराजी
मुंढें यांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य खात्यातील वरिष्ठ डॉक्टरांची लॉबी नाराज झाली होती. या सगळ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारही केली होती. तुकराम मुंढेंनी अनेक निर्णय घेतले, यातच कोणत्या डॉक्टरांनी खासगी प्रक्टीस करतात, कुणाच्या नातेवाईकांचे बाहेर दावाखाने आहेत, यासह जास्तीत जास्त वेळ सरकारी रुग्णालयात येण्याचा आदेश दिले होते. शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात जा असे सांगण्यास बंदी आली. यामुळेच खासगी रुग्णालयांना मोठा फटका बसला, आणि मुंढेंना त्याच गोष्टीचा फटका बसला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.