आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुनीषा प्रकरण:शिजान खान तुरुंगातून बाहेर, वसई न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला

ठाणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तुनीषा शर्मा मृत्यू प्रकरणात २५ डिसेंबरपासून तुरुंगात असलेला टीव्ही कलाकार शिजान खान (२८) रविवारी तुरुंगातून बाहेर आला. वसई न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिजानने आपल्या दाेन बहिणींची भेट घेतली. या वेळी त्याचे नातेवाईक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

ताे पत्रकारांशी काहीही न बाेलता तेथून निघून गेला. त्याचे नातेवाईक सकाळपासूनच त्याची प्रतीक्षा करत तेथे उभे हाेते. दरम्यान, तुनीषा २४ डिसेंबर २०२२ राेजी टीव्ही सीरियलच्या सेटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली हाेती. तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिजानला अटक झाली.

बातम्या आणखी आहेत...