आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमणुका लवकरच:विधान परिषदेवर बारा सदस्यांची लवकरच वर्णी

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनवरील गणरायाच्या दर्शनानिमित्ताने फडणवीस गेले होते. विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुका लवकरच होतील असे समजते.

महाविकास आघाडी सरकारने १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव वर्षापूर्वी पाठवला होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ४ सदस्य होते. त्याला अद्याप राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीची यादी रद्द करावी, असे पत्र राजभवनला पाठवलेले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच १२ सदस्यांच्या नियुक्त्या मार्गी लावेल असे समजते. त्यासंदर्भात फडणवीस आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रांतील व्यक्तींची नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. मात्र, त्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...