आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात:इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; मुंबईहून-पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडला. ही घटना लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजता घडली असून यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे मुंबईहून पुण्याला निघाली होती. दरम्यान, लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. यामुळे मागील दोन डब्बे अचानक रेल्वेरुळावरुन घसरले.

रेल्वे रुळावरुन घसरल्याने हा अपघात घडला.
रेल्वे रुळावरुन घसरल्याने हा अपघात घडला.

कोणतीही जीवीतहाणी नाही
रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी असून त्यात प्रवासी देखील होते. परंतु, रेल्वे थांबविण्याच्या उद्देशाने स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वेतील सर्व प्रवासी सुखरूप असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...