आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:गुजरात निवडणुकीसाठी राज्यात दोन दिवस सुट्टी, 1 व 5 डिसेंबर रोजी मतदान

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ व ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...