आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विस्फोट:पालघरमधील सॅनेटायजर फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आवाज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोईसर इंडस्ट्रियल एरियामधील गॅलेक्सी सरफॅक्ट नावाच्या फॅक्टरीत 12 वाजता धमाका झाला

पालघरच्या बोईसर इंडस्ट्रियल परिसरातील एका केमिकल फॅक्टरी सोमवारी भीषण स्फोट झाला. स्फोटोचा आाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. धमाक्यानंतर फॅक्टरीच्या एका भागात आग लागली, यात दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या परिसराला सील केले आहे. अग्नीशमन विभाग आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे, केमीकल असल्यामुळे आग विझविण्यात काही अडचणी येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रियल एरियातील एम-3 परिसरात असलेल्या गॅलेक्सी सरफॅक्ट नावाच्या फॅक्टरीमध्ये सध्या सॅनिटायजर बनवण्याचे काम सुरू होते. यादरम्यान मोठा स्फोट झाला, यात फॅक्टरीत काम करणारे दोन कर्मचारी दगावले. या अपघातात काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याता आले आहे.

बातम्या आणखी आहेत...