आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारावी कोरोना:धारावीमध्ये वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या; बुधवारी 2 नवीन रुग्ण सापडले, आता एकूण 9 कोरोनाबाधित

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आता धारावी होणार सील, मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची माहिती

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत बुधवारी कोरोना व्हायरसचे आणखी दोन नवे रुग्ण सापडले आहेत. यासोबतच, धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 झाली आहे. मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एकाचे वय 25 वर्षे असून तो मुकुंद नगर येथील रहिवासी आहे. तर दुसऱ्या रुग्णाचे वय 35 वर्षे असून तो धनवडा चॉलचा रहिवासी आहे. झोपडपट्टीचे अरुंद रस्ते आणि अतिशय गजबजलेली वसाहत पाहता येथे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या एक चिंतेचा विषय आहे.

सील करावी लागणार धारावी

मुकुंद नगर येथे सापडलेला कोरोनाचा रुग्ण 49 वर्षीय कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता. त्याच्या स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या काही दिवसांपासून त्याला क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तर चॉलमध्ये सापडलेला कोरोनाग्रस्त आणखी कुणा-कुणाच्या थेट संपर्कात आला त्यांचा सध्या तपास सुरू आहे. नियमाप्रमाणे, आता धारावीचे डेंजर झोन सील करावे लागणार असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या ठिकाणी किमान 15 लाख लोक छोट्या-छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. धारावी मुंबईला लागून असलेली सर्वात गजबजलेली वसाहत आहे.

बातम्या आणखी आहेत...