आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) दोन रन-वे 10 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई विमानतळाची रन-वे मान्सूनपूर्व पाहणी आणि दुरुस्तीच्या कामासाठी काही तासांसाठी बंद ठेवली जाते. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) नुसार, मुंबई विमानतळावर दररोज सरासरी 970 उड्डाणे येतात आणि जातात.
सीएसएमआयएने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामासाठी विमानचालकांना रन-वे क्रमांक 14/32 आणि रन-वे क्रमांक 09/27 बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करून CSMIA ने आवाहन केले आहे की, 10 मे रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोणत्याही प्रवाशाचे कोणतेही विमान असेल तर त्यांनी फ्लाइटचे वेळापत्रक तपासून घ्यावे.
मार्चपासून 21 हजार विमानांचे सुरु असते येणे जाणे
विशेष म्हणजे मार्चमध्ये मुंबई विमानतळावरून 3,967 आंतरराष्ट्रीय आणि 17,452 देशांतर्गत विमानांचे सुरु असते येणे जाणे. यासोबतच 5,38,586 आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 24,90,422 देशांतर्गत प्रवासी प्रवास करतात
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.