आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Two Stories Of Real Corona Warriors From Mumbai: 14 Friends Made Oxygen Bank Saved Lives Of Over 50 People, A Team Of 20 People Feeding Hundreds Of People Every Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत माणुसकीच्या दोन कथा:14 मित्रांनी ऑक्सिजन बँक सुरू करुन वाचवले 50 पेक्षा जास्त लोकांचे प्राण, 20 लोकांची एक टीम दररोज शेकडो लोकांना देत आहे जेवण

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रुपमधील सदस्याचा मृत्यू झाल्यावर 14 मित्रांनी बनवली ऑक्सिजन बँक

कोरोना महामारीच्या क्रूर कहरदरम्यान मुंबईमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सामान्य लोक आता पुढे येत आहे. नवी मुंबईत 14 मित्रांच्या टीमने आतापर्यंत ऑक्सिजन बँक तयार करून 50 लोकांचे प्राण वाचवले आहेत, तर 20 जणांची आणखी एक टीम कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर होम क्वारंटाइन रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन दोन्ही वेळचे जेवण मोफत देत आहे.

ऑक्सिजन बँकने 50 लोकांना मृत्यूच्या तोंडातून काढले बाहेर
ऑटोमोटिव्ह क्षेत्रात काम करणारे उडिया समाजातील 52 वर्षीय रंजन पॉल यांची ऑक्सिजन लेव्हल अचानक 14 एप्रिल रोजी 94 पासून कमी होऊ लागली. एका तासाच्या आत ऑक्सिजन लेव्हल प्रथम 84 होती आणि नंतर ती लेव्हल 77 वर गेली. घरच्यांना वाटले की कदाचित ते यापुढे रंजनला वाचवू शकणार नाहीत. अडचणीच्या काळात कुटुंबातील एका सदस्याने खारघरमधील जगन्नाथ मंदिराच्या महाराष्ट्र ओरिया वेलफेअर असोसिएशनचे विश्वस्त मनोज कुमार नाईक यांना मदतीसाठी कॉल केला.

राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यामुळे मनोजला एका मिनिटासाठी काहीही सुचत नव्हते की, या अखेरच्या वेळी रंजनचा जीव कसा वाचवावा? नंतर त्यांना नवी मुंबईमध्ये कोरोना हेल्थ ग्रुप असोसिएशन आणि वर्ल्ड एग्रोकेअर फाउंडेशन सक्रिय असल्याचा व्हॉट्सअपवर आलेल्या मॅसेजची आठवण झाली. खरेतरं नवी मुंबई परिसरात पेश्याने चार्टर्ड अकाउंटेंट, प्रॉपर्टी डीलर आणि इतर क्षेत्रातील 14 मित्रांनी मिळून ऑक्सिजन बँक सुरू केली. मनोज यांचे एक परिचित रश्मिकांत महापात्रा याच्याशी संबंधीत आहेत.

मनोज सांगतात की, त्यांनी तात्काळ रश्मिकांत महापात्रांना संपर्क करुन दोन पोर्टेबल ऑक्सिजन बॉटल देण्याचे निवेदन केले. रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलचा शोध घेत असताना रंजन यांना हे ऑक्सिजन देण्यात आले. जवळपास तीन तास रुग्णवाहिकेतून रंजन यांच्यासाठी हॉस्पिटलचा शोध घेणे सुरु होते. ऑक्सिजन बँक योग्य वेळी मिळाल्यामुळे तीन तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या रंजन याचे ऑक्सिजन लेव्हल स्थिर होऊन 92-93 पर्यंत पोहोचले. आणि ते कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीमध्ये मृत्यूच्या तोंडातून परत आले.

कोरोना हेल्थ ग्रुप असोसिएशन आणि वर्ल्ड अॅग्रोकेअर फाउंडेशनद्वारे संयुक्तपण सुरू असलेल्या ऑक्सिजन बँक मोहिममुळे अंदाजे 50 लोकांना योग्य वेळी ऑक्सिजन मिळाले आणि त्यांचा जीव वाचला. याच्याशी संबंधीत रश्मिकांत महापात्रा पेश्याने चार्टर्ड अकाउंटेट आहेत. ते सांगतात की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी आमच्या ग्रुपच्या एका सदस्याला योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आम्ही मित्रांनी लाइफ सेव्हिंग करण्याचा निर्णय घेतला.

महापात्रा सांगतात की, ऑक्सिजन बँकने कोरोना पेशंट आणि इतर गंभीररित्या आजारी जवळपास 200 रुग्णांना यावेळी मोफत आणि काहींना नाममात्र दरावर पोर्टेबल ऑक्सिजन बॉटल दिली आहे. या व्यतिरित्क 100 पोर्टेबल ऑक्सिजनचा स्टॉक आमच्याजवळ आहे. जो मेडिकल इमरजेंसीच्या कोविड पेशेंटसाठी आम्ही ठेवला आहे. त्यांनी सांगितले की, मागणी वाढल्यामुळे 200 यूनिट आणि पोर्टेबल ऑक्सीजनचा ऑर्डर देण्यात आला आहे.

ग्रुपमधील सदस्याचा मृत्यू झाल्यावर 14 मित्रांनी बनवली ऑक्सिजन बँक
14 मित्रांचा ग्रुप ऑक्सिजन बँक चालवत आहे. एखाद्या मित्राने 10 लाख, कुणी 20 लाख कुणी 25 लाख इतर मित्रांनीही आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार ऑक्सिजन बँक चालवण्यासाठी मदत केली आहे. ऑक्सिजन बँकसंबंधीत सुरेंद्र सिंह आणि अमित तेनानी सांगतात की, हे देवाचे काम आहे. आयुष्यात असे चांगले काम करण्याची खूप कमी संधी मिळते. यासाठी आम्ही आतापर्यंत किती पैसे खर्च केले. याविषयी सांगून मानव सेवेसाठी केलेल्या कामाचे महत्त्व कमी करणार नाही.

20 लोकांची अजून एक टीम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत जेवण देत आहे
समस्त महाजन संस्थेचे ट्रस्टी गिरीशभाई जे. शाह यांच्या नेतृत्त्वात मुंबईच्या उपनगरमध्ये 20 लोकांची टीम कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर होम क्वारंटाइन झालेल्या लोकांना घरोघरी जाऊन मोफतमध्ये जेवण पोहोचवत आहे. या संस्थेशी संबंधीत असलेले परेश शाह सांगतात की, 6 एप्रिलपासून मुंबईमध्ये जेव्हा लॉकडाऊनसारखे निर्बंध लागणे सुरू झाले. आम्ही समस्त महाजन संस्थेच्या नावावर मोफतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह लोकांना जेवण देण्यास सुरुवात केली. गेल्या 14 दिवसांमध्ये आम्ही 7,279 लोकांच्या घरांपर्यंत मोफतमध्ये टिफिन पोहोचवले आहे.

यासाठी आम्ही 6 ऑटो रिक्षा आणि 2 इतर वाहनांची मदत घेतो. बोलताना शाह सांगतात की, कोरोना पॉझिटिव्ह असल्यावर लोक हे घरात किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी क्वारंटाइन होतात. अशा वेळी घरी जेवण बनवणे कोणत्याही कुटुंबासाठी शक्य नसते. ही गोष्ट आमचे ट्रस्टी गिरीशभाऊ शाह यांनी समजून घेतली आणि अशा लोकांना मदत करण्याचे अभियान सुरू केले. खर्चाविषयी विचारल्यावर ते म्हणाले की, आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त खर्च आम्ही मोफत टिफिन पोहोचवण्यात केला आहे.

शाह यांच्यानुसार रोज जवळपास 500 लोकांना मोफत टिफिन पोहोचवले जात आहे. अनेक वेळा शनिवार आणि रविवारी मागणी वाढते. परंतु आम्ही सेवा देण्याचे काम करतो.

बातम्या आणखी आहेत...