आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2 महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश साबळे असे आरोपीचे नाव असून तो बीएमसीत घनकचरा व्यवस्थापन समितीत अधिकारी आहे. प्रकाश साबळेच्या विरोधात कलम 354 अन्वये शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली.
पीडित महिलेने बीएमसीच्या जी वार्डमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक मनपा आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार, आरोपी अधिकारी साबळे याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. तसेच शरीरसुखाची मागणी केली.
सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "महिलेने बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचवेळी 3 महिलांची एक चौकशी समिती नेमण्यात आली. तपास सुरू असतानाच आणखी एका महिलेने त्या समितीकडे धाव घेऊन आपल्यावरही त्याच अधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा आरोप केला. यानंतर शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली." यानंतर पोलिसांनी प्रकाश साबळेला अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.