आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी आमच्याकडे एकनाथ आहे, त्यामुळे आमचेच सरकार येणार असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीवरुन सामंत यांनी ही टीका केली आहे.
नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात या वेळी महाराष्ट्र तसेच देशाच्या राजकारणावर चर्चा झाली. त्यांच्या या भेटीवर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.
त्यामुळे आमचेच सरकार येणार
उदय सामंत म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागनाथ सापनाथ एकत्र आले आहेत. मात्र त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की, कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचेच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचेच सरकार येणार.
लोकांना पोटशूळ उठलाय
उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात युतीचे सरकार चांगले कार करतेय. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठलाय. दोन अस्तित्वासाठी लढणारे पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यातून फार काही साध्य होईल असे वाटत नाही, असा टोला अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंना लगावला.
चर्चेत राहण्याची सवय
उदय सामंत यांनी सामना अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. उद्य सामंत म्हणाले, संजय राऊत यांना सतत चर्चेत राहण्याची सवय आहे. त्यांच्याकडे आता काहीही कामे राहिलेली नाहीत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी रत्नागिरीत येत आहेत. याविषयी सामंतांनी माहिती दिली.
संबंधित वृत्त
गोष्टीवेल्हाळ शिंदे:खरीप नियोजनाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऐकवले आपल्याच ‘शेतीचे प्रयोग’! अधिकाऱ्यांचे प्रेझेंटेशन राहिले बाजूला
यंदाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी (ता.२४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंची ही पहिलीच खरीप बैठक. त्यात ते काय सूचना देतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र सध्याच्या परिस्थितीवर उपाय सुचवण्याएेवजी मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावी आपण शेतीत काय नवनवीन प्रयोग केले याचेच किस्से अधिकाऱ्यांना एेकवण्यात धन्यता मानली. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.