आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदय सामंत यांना जाळून टाकू:भर कार्यक्रमात नाना पटोलेंच्या समोरच रिफायनरी विरोधकाची धमकी; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल राजापुरात एक सभा झाली. त्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिली. धमकी देणाऱ्या या कार्यकर्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

धमकी दिलेल्या या कार्यकर्त्याचे नाव अप्पा जोशी असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, या घटनेची दखल पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. रिफायनरीला विरोधक करणारे मंत्री उदय सामंत यांच्यावर आक्रमक झाले आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

काय दिली धमकी?

आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोणीही कंपन्या उघडून टाकतो. कुठला तरी मंत्री सांगतोय, त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही. काय माहिती देताय ते, 2900 एकरची मालकी आहे, मालकी बिलकी गेली खड्यात. आमच्या जागा, आमचे गाव आहे. उद्या आम्ही काही खपवून घेणार नाही. आमची जागा आम्हाला पाहिजे, पंचक्रोशी आम्हाला पाहिजे, जर कुणी आमच्या पंचक्रोशीत पाय ठेवला तर त्याचा पाय तोडून हातात देऊ. या आंदोलनावर जर गोळीबार झाला तर याची पहिली गोळी, हा अप्पा जोशी घेईल, असेही हा कार्यकर्ता म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...