आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा तर होणारच:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वातावरण; मंत्री उदय सामंत यांचे वक्तव्य

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषतदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना टीका करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले. ते मुंबईत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यावरून अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.

दानवे म्हणतात की...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा फक्त दिखावा असून, त्यांना रामाचे विचार कधीच झेपणार नाहीत. राम मंदिर व्हावे म्हणून 'पहिले मंदिर फिर सरकार' अशी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. पण आता न्यायालयाने निकाल दिला, राम मंदिर पण होत आहे. अशावेळी अयोध्येला जाणे मर्दुमकी आहे, अशी टीका दानवे यांनी केली होती.

काहीच अर्थ नाही...

दानवे यांना उत्तर देताना सामंत म्हणाले की, ऑलरेडी अंबादास दानवे हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, या पद्धतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडे अशी टीका करण्याशिवाय पर्याय उरला नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी अंबादास दानवे हे दुसऱ्याचे बघून टीका करत आहेत. मात्र, त्याला काही अर्थ आहे असे वाटत नाही.

आदित्य म्हणतात की...

आता कलियुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, पण नक्कीच या महाराष्ट्रात आम्ही रामराज्य आणू. 'रघुकुल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये' हे आमचे ब्रीद वाक्यच आहे. जी जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करून दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचे वचन तर हेच आहे की, लोकशाहीसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी वज्रमूठ प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केली होती.

स्वप्ने पाहू शकतो...

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, आपण स्वप्न पाहायला हरकत नाही. आपण मोठ-मोठी स्वप्न पाहू शकतो. मी देखील झोपेत असे म्हणून शकतो की, मी तिकडे बायडेनसारखा अमेरिकेत अध्यक्ष होईन. हे स्वप्न आहे. शेवटी जनता ते पूर्ण करत असते. त्यामुळे स्वप्न बघणाऱ्यांच्यावर काही जास्त बोलावे, असे मला वाटत नाही.