आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा मेगा इव्हेंट:गेलेल्या प्रकल्पांची वस्तुस्थिती दाखवण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार - उदय सामंत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात मेगा खोटे बोलण्याचा इव्हेंट सुरू आहे. काही मंडळी बातम्या घेऊन आणि स्वःत ट्विट घेऊन बसत आहेत. कंपनी गेल्याचे खापर आमच्यावर फोडले जात आहे. परंतु येत्या एक महिन्यात वेदांता फाॅक्सकाॅन, एअरबस, सीनारमन, सॅफ्रॅन असेल याबाबत खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी येत्या एक महिन्यात श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सम्रंभ करण्याचा प्रयत्न

सामंत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी कालच सर्व स्पष्ट केले आहे. राज्यात उद्योजकांबाबत नकारात्मक वातावरण गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे. सॅफ्रन कंपनीबाबत सम्रंभ करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.

खरी वस्तूस्थिती सांगणार

सामंत म्हणाले, वेदांता फाॅक्सकाॅन, एअरबस, सीनारमन, सॅफ्रॅन असेल याबाबत खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी येत्या एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेत महाराष्ट्र शासन, एमआयडीसी आणि उद्योग विभागाने विदेशी कंपन्यांसोबत केलेला पत्रव्यवहार आणि दाऊस येथील उद्योग बैठक असेल या बैठकीनंतरचे नक्की रेकार्ड एमआयडीसी आणि उद्योग विभागाकडे काय आहे याचा अहवाल आम्ही महाराष्ट्रातील तरुणांना देणार आहोत.

कंपनी येणार नव्हतीच

सामंत म्हणाले, काल संम्रभ निर्माण करणाऱ्या गोष्टीबाबत आमच्या महामंडळाने खुलासा केला आहे. यात स्पष्ट म्हटले की, 5 जुलै 2022 ला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर सॅफ्रन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलीव्हियन अ‌ॅंड्रीस यांनी दिल्लीहूनच सदर कंपनी हैदराबादेत स्थापन करण्याचे जाहीर केले होते.

सॅफ्रनने जागा मागितली नाही

सामंत म्हणाले, महाराष्ट्रात जागेबाबत सॅफ्रन कंपनीने मागणी किंवा पाठपूरावा केला नव्हता. महाराष्ट्र सोडून प्रकल्प इतर ठिकाणी गेला असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. हे उद्योग महामंडळाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...