आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घोषणेच्या वादावर प्रतिक्रिया:व्यंकय्या नायडूंचे काहीच चुकले नाही, शिवरायांचा अपमान झाला असता तर...; शपथविधी वादावर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयनराजे भोसले - फाइल फोटो
  • जे घडले नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, उदयनराजेंची विनंती

नवनिर्वाचीत राज्यसभा सदस्यांचा शपथविधी बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषावर आक्षेप घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता स्वत: उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही

"राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही. रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता." असे उदयनराजे भोसले म्हणाले. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. 

शपथविधीच्या वेळी शरद पवार देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे तेथे काय घडले त्यांना विचारा. कृपा करुन जे घडले नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंतीही उदयनराजे यांनी केली. 

घोषणेच्या वादात संजय राऊतांचीही उडी

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी याविषयावर ट्विट केले आहे. त्यांनी भाजप आणि संभाजी भिडेंवर टीकास्त्र साधले आहे. राऊत म्हणाले की, 'छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. असे म्हणत त्यांनी जय भवानी!जय शिवाजी! अशी घोषणा ट्विटरवरून दिली आहे. 

0