आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मुंबई पालिका निवडणुकीचा "उद्धव’नी फुंकला बिगुल, बोगदे खणण्याच्या कामाचा प्रारंभ, विकासाची लढाई सुरू असल्याचा केला दावा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा प्रारंभ केला.

कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरू झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्कीच जिंकू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा प्रारंभ केला. या वेळी त्यांनी विकासाच्या लढाईचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर विकासविरोधाचा आरोप करणाऱ्या भाजपला टोला लगावला.

आरेतील मेट्रा कारशेडला स्थगिती तसेच बुलेट ट्रेनला सेनेचा विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विकासविरोधी आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात येत होती. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागरी किनारा मार्गाच्या बोगद्याच्या शुभारंभावेळी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ असल्याचे मानले जात आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी बोगदे खणणारे “मावळा’ संयंत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेने जगाने दखल घ्यावे असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक “मावळ्यां’ची कामगिरी महत्त्वाची ठरेल. मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा क्षण आहे, असा दावा त्यांनी केला. रणांगणात मावळे लढत असतात, तसे बृहन्मुंबई महापालिकेच्या या कामात आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, अभियंते, कर्मचारी हे सगळेच मावळे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या कामांचे कौतुक केले.

काय आहे मावळा
बोगदा खणणारे टीबीएम हे महत्त्वाचे साधन आहे. या टीबीएम मशीनला ‘मावळा’ नाव देण्यात आले आहे. हे अजस्र यंत्र १२.१९ मीटर व्यासाचे आहे. देशात आतापर्यंत वापरण्यात येणारे सर्वात मोठ्या व्यासाचे हे टीबीएम मशीन आहे. समुद्राखालून ४०० मीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...