आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:उद्धव आले, सही केली अन् निघून गेले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख व विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सभागृहाला अद्याप पाय लागलेले नाहीत. उद्धव दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. ते विधिमंडळ परिसरात मंगळवारी आले, पण सभागृहात क्षणभरही फिरकले नाहीत. त्यामुळे उरल्यासुरल्या शिवसेना आमदारांचा आज पुन्हा चांगलाच हिरमोड झाला.

मंगळवारी सकाळी ते विधिमंडळात परिसरात आले. तेथे महाविकास आघाडीची बैठक झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आघाडीचा परफाॅर्मन्स अत्यंत खराब होता, अशी टिप्पणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बसले. सभागृह चालू होताच उद्धव यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत आले. त्यामुळे साहेब आज सभागृहात येतील, अशी सर्वांची अटकळ होती. मात्र, उद्वव ठाकरे सभागृहात काही गेले नाहीत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

बातम्या आणखी आहेत...