आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाली गुंफा प्रकरण:रविंद्र वायकर हा उद्धव ठाकरेंचा माफिया कॉन्ट्र‌‌‌ॅक्टर, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत तुरुंगात आहे. तर डावा हात अनिल परब यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू आहे. तर त्यांचा तिसरा हात रविंद्र वायकर असून त्याचे घोटाळे बाहेर येत आहेत. हा ठाकरे सरकारचा माफिया कॉन्ट्र‌‌‌ॅक्टर आहे, या शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी महाकाली गुंफा आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच सध्या तुरुंगात असलेले अविनाश भोसले यांना 500 कोटींचे कंत्राट दिल्याचा दावाही त्यांनी केला. संपूर्ण व्यवहाराला मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महापालिकेने पाठिंबा दिल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंचा पाठिंबा असल्यामुळेच या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

यापूर्वीही मुंबईतील महाकाली गुंफा मंदिर आणि परिसरातील विकास प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...