आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री राणेंची टीका:उद्धव ठाकरे काम न करणारा नेता, गिनीज बुकमध्ये नाव नोंदवावे

सिंधुदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत काम करणारा नेता आपण पाहिला आहे. काहींनी घरात बसूनही काम केले. मात्र घरात बसून काम न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केला आहे. तसेच घरात बसून काम करणारा नेता, हा रेकॉर्ड आहे, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाेंदवला जावा, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित स्नेहबंध या कार्यक्रमात बोलत हाेते. या वेळी प्रसिद्ध निवेदक अमोल परचुरे यांनी नारायण राणे यांची मुलाखत घेतली. या वेळी नारायण राणे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आपल्या शैलीत सडेतोड उत्तरे दिली.